
शहर वाहतूक बसमधील सवलतीमुळे महिलांकडून जोरदार प्रतिसाद
महिलांसाठी शहर बसमधूनही तिकिट दर निम्मे करण्यात आल्याने रविवारी पहिल्याच दिवशी एसटीला महिलांनी पसंती दिली. नेहमी शेअर रिक्षाने जाणार्या महिला उशिरा जावू पण एसटी बसने जावू अशी भूमिका घेताना दिसून आल्या. रविवारचा दिवस असूनही सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३ हजारांहून अधिक महिलांनी एसटीच्या मिम्म्या तिकिटांचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. एखाद दुसरा पुरूष प्रवासी सोडला तर महिलाच बसमध्ये असल्याचे चित्र दिसत होते.www.konkantoday.com