
रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गोरगरीब, वृद्ध, दिव्यांग गरजू रूग्णांची डॉक्टर नसल्याने गैरसोय होत आहे. यावर उपाययोजना करून लवकरात लवकर कान, नाक, घशाचे डॉक्टर, भूलतज्ञ, एम.डी. मेडिसीन फिजिशियन, अनेक डॉक्टर, मेडिकल स्टाफ, एम.आर.आय. मशीन अशा अनेक सुविधा उपलब्ध रूग्णांची व्यवस्था करावी, अशी मागणी शिव आरोग्य सेनेचे जिल्हा समन्वयक शशिकांत मारूती चव्हाण यांनी वैद्यकीय महाविद्यालय, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंदन तसेच शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांना निवेदन देवून सविस्तर चर्चा केली.www.konkantoday.com