
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरसह अन्य ठिकाणी महामार्गाची चाळण
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अपुर्या कामामुळे प्रवाशांचे पुरते कंबरडे मोडले आहे. विशेषतः संगमेश्वर तालुक्यात राहिलेल्या अपुर्या कामामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धामणी, संगमेश्वर पैसाफंड समोर, सोनगिरी आदी भागात रस्त्याची चाळण झाली आहे. दुरवस्था झालेल्या ठिकाणी प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने प्रवाशांकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जात आहे.www.konkantoday.com