पाऊस सुरू होताच लोटे एमआयडीसीमधील कारखान्यांनी उघडयावर सोडले रासायनिक सांडपाणी, परिसरात दुर्गंधी
लोटे एमआयडीसी परिसरात मुसळधार पावसात उघड्यावर वाहणार्या ओढे आणि नाल्यात चक्क रासायनिक सांडपाणी वाहत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.लोटे एमआयडीसी हा परिसर केमिकल झोन आहे. येथील रासायनिक कंपन्यांनी त्यांचे रासायनिक सांडपाणी साहूहिक सांडपाणी प्रकल्प म्हणजेच सीएईटीपीमध्ये सोडून त्या ठिकाणी त्या दूषित रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करून नंतर ते लांब खाडीत सोडले जाते. यासाठी प्रत्येक कंपनीला ठराविक शुल्क आकारले जाते. आपला आर्थिक फायदा होण्यासाठी लहान आणि मध्यमवर्गी कंपन्यांकडून पावसाचा फायदा घेवून रासायनिक सांडपाणी सरळ सरळ उघड्याावर ओढे आणि नाल्यामध्ये सोडले जाते. या संदर्भात स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून उघड्यावर घातक रासायनिक सांडपाणी सोडणार्या कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.www.konkantoday.com