नदी की पाठशाला अभियान महाराष्ट्र राज्यात राबविण्याची गरज
नद्यांचे खर्या अर्थाने संवर्धन करायचे असेल तर नदी की पाठशाला हा उपक्रम राज्यात राबवला पाहिजे, तशी मागणी आपण शासनाकडे करणार अस्याची माहिती जलपुरूष डॉ. राजेंद्रसिंह यांनी रविवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.नगर परिषदेच्यावतीने डीबीजे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित नदी की पाठशाला या निवासी शिबिरासाठी डॉ. राजेंद्रसिंह येथे आले होते. रविवारी शिबिराच्या समारोपानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, सध्याची नद्यांची अवस्था पाहता त्या अतिक्रमण, प्रदूषण याने गुदमरल्या आहेत. जंगलतोडीमुळे वाहून येणारे दगड, माती यामुळे त्यांची पात्र भरली आहेत. म्हणून सर्वत्र पूर येत आहे. त्यामुळे समस्यांमध्ये अडकलेल्या नद्यांना आपण संवादातून बाहेर काढू शकतो. त्यासाठी नदी की पाठशाला या अनोख्या उपक्रमाची गरज आहे. हा उपक्रम राज्यातील नगर परिषदा, ग्रामपंचायती यांनीही राबवावा, अशी मागणी आपण शासनाकडे करणार आहोत.www.konkantoday.com