जि.प.शाळा जांभरूण नं.१ ता.रत्नागिरी शाळेत आनापानसति ध्यान साधना कार्यशाळा उत्साहात संपन्न

रत्नागिरी तालुक्यातील जि.प.पू.प्रा.शाळा जांभरुण नं.१ येथे आनापानसति ध्यान तथा मित्र उपक्रम कार्यशाळा संपन्न झाली. कोणत्याही कार्याची उत्पत्ती मनातून होते.त्यासाठी मनावर संस्कार करणे,त्याला वळण लावण्याचे काम विपश्यना करते.प्रापंचिक संसारातील ताणतणाव,दुःख आणि मनाच्या एकाग्रतेसाठीही विपश्यना काम करते.विद्यार्थ्यांना याचा अभ्यासात,पालकांनाही त्यांच्या कौटुंबिक जीवनात चांगला फायदा होतो.विपश्यनेची पहिली पायरी आनापानसति त्याचा दरदिवशी १० मिनिटे सराव केल्यास आपल्या जीवनात परिवर्तनाची सुरुवात होईल. असेही धम्मपदेस कोकण विपश्यना मेडिटेशन सेंटर पाथरट – पाली रत्नागिरीचे विश्वस्त मा.श्री.संतोष आयरे यांनी मित्र उपक्रमा संबंधी आणि आनापानसति ध्यान साधनेचे महत्व समजावून दिले व त्यानंतर ऑडिओ च्या मदतीने आनापानसति ध्यानाचा विद्यार्थी, पालक,व शिक्षकांकडून सराव करुन घेतला.पाली येथील मेडिटेशन सेंटरला एकदा तरी अवश्य भेट द्या.मेडिटेशन साठी शासकीय कर्मचाऱ्यांना रजाही मिळत असून याचा लाभ शासकीय कर्मचाऱ्यांनी आणि पालकवर्गाने अवश्य घ्यावा असे आवाहनही यावेळी श्री.आयरे यांनी केले. ध्यानसाधनेच्या सरावानंतर पदवीधर शिक्षक श्री.राजू कोकणी व उपशिक्षिका श्रीम.यास्मिन कोतवाल यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून वेदांत सावंत व अनुष्का सावंत व महिला आणि पालकप्रतिनिधी म्हणून श्रीम.समिक्षा सावंत यांनी ध्यान साधनेच्या अनुभव कथन केले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्रीम.प्रांजल साळुंके, ग्रामपंचायत सदस्या श्रीम.वैष्णवी साळुंके,अंगणवाडी सेविका आदींसह महिला पालकांची उपस्थिती होती.या कार्यक्रमासाठी उपस्थितांचे स्वागत शाळेचे पदवीधर शिक्षक श्री.संतोष रावणंग तर प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.राजेश पवार यांनी केले.उपस्थित पालकवर्गानेही पाली येथील मेडिटेशन सेंटरला भेट देण्याचे आश्वासन श्री.आयरे यांना दिले.ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी श्रीम.सुरेखा आयरे यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button