जंगलतोड हेच कोकणातील पुराचे मुख्य कारण, -डॉ. राजेंद्रसिंह
कोकणचे निसर्गसौंदर्य कोणीतरी हिरावून घेत आहे. येथे होणारी बेसुमार जंगलतोड पुराचे मुख्य कारण असल्याचे मत जलपुरूष डॉ राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले. पूर, त्यामुळे होणारे नुकसान नको असेल तर अतिक्रमण काढण्याची गरज असून दुषित पाणी नद्यांमध्ये जावू देवू नका, असा सल्लाही त्यांनी अधिकार्यांना दिला.नद्यांना समजून घेणे, त्याचा तट, प्रवाह, जैवविविधता, नद्या आणि समाजाचे नाते याविषयी कृतीशील कौशल्ये व ज्ञान देण्यासाठी तीन दिवस डीबीजे महाविद्यालयात कोकणस्तरीय नदीय की पाठशाला या अनोख्या निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याचा रविवारी समारोह झाला. यावेळी ते बोलत होते. डॉ. राजेंद्रसिंह पुढे म्हणाले की, जंगल हे कोकणला लाभलेले मोठे वरदान आहे. ते पाहण्यासाठी जग येथे येते. हेच जंगल आमचा मूळ आधार आहे. असे असताना त्याच जंगलावर कुर्हाड चालवली जात आहे. यामुळे माती, दगड वाहून थेट नदनयांमध्ये जात असल्याने नद्यांचा तळ वर येतो. म्हणूनच कमी पाऊस पडला तरी पूर येतो. कोकणातील जंगलतोड हेच पुराचे मुख्य कारण आहे. त्यामुळे ही बेसुमार जंगलतोड थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.www.konkantoday.com