चिपळूण शहरात कचरा संकलनासाठी क्यूआर कोड सिस्टिम
घरकुती कचरा संकलनासाठी आता चिपळूण शहरात क्यूआर कोड सिस्टम आणण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने एजन्सी नेमली आहे. त्या एजन्सीतर्फे शहरात क्यूआर कोड सिस्टीम बसवण्याचे काम सुरू आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सरकारच्या नगर विकासामार्फत स्वच्छ महाराष्ट्र हा नवा प्रयोग करण्यात आला असून त्या माध्यमातून रोजच्या रोज घरगुती कचरा संकलन होतो की नाही आणि कचर्याचे योग्य नियोजन केले जाते की नाही याबाबत माहिती या क्यूआर कोडमुळे मिळणार आहे. त्यामुळे आता घरगुती कचर्यालाही आधुनिक जगात क्यूआर कोड लागणार आहे.www.konkantoday.com