चिपळूण तालुक्यातील टेरवमधील भव्य शिवस्मारक उभारणी रखडली
चिपळूण तालुक्यातील श्री क्षेत्र टेरव येथील भवानी वाघजाई मंदिराला ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा शासन निर्णय १६ जून २०२४ रोजी पारीत झाला. त्यानुसार स्मारक बांधकाामाचा आराखडा व बांधकामावर सनियंत्रणासाठी तत्कालीन जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली १८ जणांची समिती गठीत करण्यात आली. मात्र गेल्या दोन वर्षात यासंदर्भात ना बैठक झाली ना कोणती कार्यवाही झाली. त्यामुळे ग्रामपंचायतीने आमदार शेखर निकम यांना पत्र देत स्मारकाबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्याची मागणी केली आहे.www.konkantoday.com