चिपळुणात भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले, पंधरा दिवसात बारा जणांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले
चिपळूण शहरात नगरपरिषदेने गेल्या दोन वर्षात भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवर लाखो रुपये खर्च केले असले तरी कुत्र्यांची संख्या शहरात कायम आहे. सध्या भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून गेल्या पंधरा दिवसात बारा जणांवर हल्ले करत त्यांचा चावा घेतला आहे. भटक्या कुत्र्यांच्या या दशहतीमुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांसह माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.www.konkantoday.com