उमेदवार रमेश कीर यांच्या रूपाने कोकणातील असंख्य पदवीधारक बेरोजगारांना एक नवी आशा -सौ. हुस्नबानू खलिफे
कॉंग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इंडिया आघाडीचे कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार रमेश कीर यांच्या रूपाने कोकणातील असंख्य पदवीधारक बेरोजगारांना एक नवी आशा दिसत आहे. गेली बारा वर्षे कोकणला अशा मतदारसंघाचा एक आमदार आहे. ह देखिल समजलेले नाही. त्यामुळे आता बेरोजगार पदवीधर आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडू शकण्याची क्षमता असलेल्या धडाडीच्या रमेश कीर यांच्यासोबत अवघ्या कोकणने ठामपणे उभे राहिले पाहिजे आणि बारा वर्षाचा वनवास संपवला पाहिजे, असे आग्रही मत माजी आमार ऍड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.www.konkantoday.com