लोकसभेला जो बांबू गेला आहे. तो कसा काढावा. ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा हा प्रश्न त्यांना पडला आहे-संजय राऊत
काही लोकांना बांबू लावला पाहिजे असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्यांनी नाव न घेता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. यावर संजय राऊत यांनी आपल्या शिवराळ भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे.सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आहेत, बेकायदेशीर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने देखील हे म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही जो बांबू घातला आहे, तो अजून निघालेला नाही. त्यांच्या महायुतीला आम्ही बांबू घातला आहे. तो काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांना स्वप्नात सुद्धा बांबू दिसतोय, इतक्या आतमध्ये तो बांबू गेला आहे, अशी कडवट टीका राऊतांनी केली.विधानसभेला हा बांबू आरपार जाणार आहे. हे लिहून घ्या. याच बांबूचे फटके लोकं रस्त्या-रस्त्यावर मारतील. बांबूचे वेगवेगळे बाय प्रोडक्ट असतात. या बाय प्रोडक्टचे प्रयोग त्यांच्यासोबत होणार आहेत. लोकसभेला जो बांबू गेला आहे. तो कसा काढावा. ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा हा प्रश्न त्यांना पडला आहे, असं राऊत म्हणाले.मोदी-शाह असताना बांबू घालत आहेत. त्यामुळे ते आता बांबूवर अभ्यास करतील. त्यांना बांबूवर एखादी डिग्री मिळू शकते. पण, ती डिग्री बोगस असेल असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला.www.konkantoday.com