महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा रत्नागिरीने तालुक्यातील नवनियुक्त शिक्षण सेवकांच्या स्वागतासाठी केले मेळाव्याचे आयोजन

पवित्र पोर्टल भरतीच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यामध्ये 54 नवनियुक्त शिक्षणसेवक गेल्या मे महिन्यामध्ये रुजू झाले आहेत. त्यांचे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा रत्नागिरीच्या वतीने स्वागत करण्यासाठी विभागवार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. रत्नागिरी तालुक्यात नियुक्त झालेले सर्वच्या सर्व नवनियुक्त शिक्षणसेवक उपस्थित होते. याप्रसंगी त्यांना संघटनेकडून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व छोटीशी भेट देण्यात आली. सर्वांनी आपला परिचय देऊन संघटनेने आपल्याला हजर होण्यापूर्वीपासून वेळोवेळी केलेल्या मदतीसाठी व स्वागत समारंभ आयोजित केलेबद्दल संघटनेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करतांना संघटनेचे महत्त्व, संघटनेने केलेली कामे तसेच प्रशासकीय शालेय कामकाज याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आपल्या अडचणी सोडवण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त करून जुनी पेन्शनच्या लढ्यात सहभागी होण्याचे आव्हान केले. शिक्षक पतपेढीचे महत्व सांगून विविध योजनांची माहिती देऊन पतपेढीचे सदस्य होण्याचे आव्हान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष श्री. अंकुश चांगण, महिला जिल्हा आघाडी प्रमुख सौ. विभा बाणे, जिल्हा सरचिटणीस श्री. दत्तात्रय क्षीरसागर जिल्हा उपाध्यक्ष श्री. हनुमंत पाटील, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख श्री. महेंद्र ढाकणे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री.राहुल अलकटवार तालुका नेते श्री.शिवाजी घुटे, तालुका कार्याध्यक्ष श्री. तुकाराम मुरकुटे, तालुका सरचिटणीस श्री. भाऊसाहेब काटे तालुका कोषाध्यक्ष श्री. रामनाथ बने, तालुका उपाध्यक्ष श्री. अवधूत शिंदे, महिला तालुका आघाडी प्रमुख सौ. वृषाली हेळेकर,तालुका महिला आघाडी प्रतिनिधी सौ. अक्षदा सायगांवकर, तालुका संघटक श्री. नवनाथ कुटे, तालुका प्रसिद्धप्रमुख श्री. सुजित वाफेलकर,तालुका सहसचिव श्री. गणपती पडूळे, हातखंबा विभाग प्रमुख श्री वैजनाथ जाधव, गणपतीपुळे विभाग प्रमुख श्री.गोविंद डुमनर व श्री. अनंत चाटे, शिरगाव विभाग प्रमुख श्री. मोसिन आत्तार केंद्र संघटक श्री. अशोक दाताळ व श्री. राहुल दुधाळे,श्री परमेश्वर अलापूरे, श्री सचिन पाटील, श्री. महेश जाधव, श्री. अण्णा गाटे, श्री. जयदत्त तकीक, श्रीकांत भडंगे, श्री. कल्याण कदम, श्री. माधव अंकलगे, श्री. अनंत चाटे , श्री. मुंडे,श्री मारोती फड, श्री. सत्यवान गायखे, श्री. अजय गावडे, महिला पेन्शन फायटर सौ. धानेश्वरी स्वामी सौ.अनिता मोरगे तसेच जाकादेवी, खंडाळा व रत्नागिरी असे तालुक्यातील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे सर्व पेन्शन फायटर्स या स्वागत समारंभासाठी उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. पेन्शन फायटर रामनाथ बने, विक्रम पाटील व गोविंद डुमनर यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button