मद्यपी ग्राहकाने पाणी उशिरा दिल्याने हॉटेलमध्ये घुसवली कार, चिपळूणमधील प्रकार

पाणी उशिरा दिल्याच्या कारणावरून हॉटेल मालकाशी वाद घालून तेथील कर्मचार्यांच्या अंगावर कार घालण्यासाठी एका मद्यपी ग्राहकाने कार त्या हॉटेलमध्ये घुसवल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास शहरातील ओमीज किचन हॉटेल येथे घडला. सुदैवाने हॉटेलसमोर अनेक दुचाकी पार्क असल्याने त्यावर ही कार धडकली. यात चार ते पाच दुचाकींचे नुकसान झाले असून एखाद्या फिल्मी स्टाईलप्रमाणे घडलेल्या या प्रकरणी त्या मद्यपीवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद विजय आयरे (४८, रा. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील काविळतळी परिसरात ओमीज किचन हे हॉटेल आहे. शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास आशीर्वाद आयरे हा या हॉटेलमध्ये आल्यानंतर त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. मात्र पाणी, देण्यास उशीर झाल्याने मद्यधुंद असलेल्या आयरे याने हॉटेल मालकासह तेथील कामगार व हॉटेल काऊंटरवर असलेल्या महिलेशी वाद घातला. रागाच्या भरात आयरे हॉटेलमधून निघून गेल्यानंतर त्याने हॉटेलबाहेर उभी असलेली त्याची कार भरधाव वेगाने आणून कर्मचार्यांच्या अंगावर घालण्यासाठी ती हॉटेलमध्ये घुसवली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button