
पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावरील ९ नद्यांवर पुराचा इशारा देणारी यंत्रणा
कोकण रेल्वे प्रशासनाने पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी परिपूर्ण तयारी केली आहे. त्यासाठी खबरदारी म्हणून सर्व यंत्रणा ठिकठिकाणी तैनात केल्या आहेत. त्यामध्ये गस्तीसाठी ६७२ जवान, ९ गेल्वेस्थानकात रेल्वे मेंटेनन्स वाहन, वेर्णा येथे अपघात निवारण ट्रेन आणि प्रमुख नद्यांवर पुराचा इशारा देणारी यंत्रणा बसवली असल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.कोकण रेल्वे प्रशासनही संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगण्यात आले. कोकण रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या सुरळीत धावती, असा विश्वास कोकण रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त केला आहे. प्रवाशांचा प्रवास या मार्गावरून सुखकर होण्यासाठी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मार्गावरील नद्यांवर पुराचा इशारा देणारी यंत्रणा काली नदी (माणगाव व वीरदरम्यान) आणि वाशिष्ठी नदी (चिपळूण व कामथेदरम्यान) या ३ पुलांवर पूर इशारा यंत्रणा बसल्यामुळे पाण्याची पातळी धोकादायक पातळीपर्यंत पोहोचल्यास अधिकार्यांना सतर्क केले जाईल, असे सांगण्यात आले.पावसाळ्यात रेल्वेमार्गावर गस्त घालण्यासाठी ६७२ जवान तैनात केले असून असुरक्षित ठिकाणी ते २४ तास गस्त घालणार आहेत. तसेच या भागात रेल्वेचे वेगावरील निर्बंध लादले आहेत. ९ ठिकाणी रेल्वे मेंटेनन्स व्हेईकल ठेवले आहे. त्यामुळे आणीबाणीत ते मदतीस धावून जातील. त्यात वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वेर्णा, कारवार, भटवापर कोकण रेल्वेची परिपूर्ण सुसज्जता आणि उडपी स्थानकांचा समावेश आहे. तर माणगांव, चिपळूण, रत्नागिरी ठिकाणी वार्याच्या वेगाने निरीक्षण करण्यासाठी पनवेल मार्ग (रत्नागिरी व निवसदरदरम्यान), मांडवी पूल (थिवीम व करमाळीदरम्यान), झुआरी पूल (करमाळी व वेर्णा) व शरावती पूल (होन्नावर व मानकीदरम्यान) या चार ठिकाणी ऍमिनोमीटर स्थापित केले आहेत. www.konkantoday.com