
पालू फाटा येथे दुचाकी अपघातात तरूण गंभीर जखमी
लांजा तालुक्यातील पालू फाटा येथे शनिवारी सकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. राजेश शांताराम गुरव असे दुचाकीस्वाराचे नाव असून तो तालुक्यातील कोचरी येथून कोर्लेकडे जात असताना तोल जावून रस्त्यावर पडला.तालुक्यातील कोचरी येथील राजेश गुरव (२३) त्यांच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच. ०८ बीडी ६२७२) घेवून शनिवारी सकाळी कोर्लेकडे जात होता. पालू फाटा येथे त्याचा तोल जावून तो रस्त्यावर पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. डोक्याला जखमा झाल्याने त्याला तातडीने रत्नागिरी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.www.konkantoday.com