जातीपातीचं विष कालवणाऱ्या लोकांना महाराष्ट्रानं दूर ठेवलं पाहिजे- मनसे अध्यक्ष राज ठाकरे
मी इतकी वर्ष सर्व समाजाला सांगतोय, या जातीपातीच्या वादातून काय निष्पन्न होणार नाही. हे सगळे पुढारी जातीपातीत द्वेष पसरवून फक्त मते हातात घेतील.आता लहान लहान मुलं जातीपातीवरून एकमेकांशी बोलतायेत. हे शाळा कॉलेजपर्यंत विष जाईल हे मी आधी सांगितले होते. जातीपातीचं विष कालवणाऱ्या लोकांना महाराष्ट्रानं दूर ठेवलं पाहिजे असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर राज यांनी राज्यातील जातीय आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणाले की, जातीय विष महाराष्ट्रात कधी नव्हते. कितीही आवडणारा पक्ष असेल किंवा नेता असेल पण असं जर ते करणार असतील तर पुढच्या पिढीनं जगायचं कसं?. महाराष्ट्राचं काय होणार? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. www.konkantoday.com