चिपळूण आगारातून शहरांतर्गत एसटीची वाहतूक सुरू
राज्य परिवहन विभागाच्या चिपळूण आगारातून शहरांतर्गत एसटीची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांकडून सामान्य लोकांची होणारी लूट थांबणार आहे.पहाटे पाच वाजेपासून रात्री साडेबारा वाजेपर्यंत एकूण १६ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. चिपळूण शहरात रिक्षा चालकांकडून सामान्य ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप वारंवार ग्रामस्थांकडून केला जात आहे. मात्र त्यावर कोणीही कारवाई करत नाही.www.konkantoday.com