चंडीगढ़ येथून बनावट “ट्रेडिंग ॲप्लिकेशन” व “शेअर मार्केट ट्रेडिंग” करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या मुख्य इसमास खेड पोलीसांद्वारे अटक

. दि. 19/04/2024 ते दि. 24/05/2024 रोजी फिर्यादी यांना “ARK Learning Group” या WhatsApp ग्रुपवरील ट्रेडींग संदर्भातील मेसेज तसेच 8250733503 आणि 8735938239 या मोबाईल क्रमांकावरून येणाऱ्या WhatsApp संदेश द्रवारे फिर्यादी यांना “ARK Investment Group” या कंपनीमध्ये पैश्याची गुंतवणूक करून जास्तीत जास्त रकमेचा परतावा देण्यात येईल असे सांगून फिर्यादी यांची अनोळखी इसमांनी ₹24,85,000/- रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली म्हणून दिनांक ०३/०६/२०२४ रोजी खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं. १९९/२०२४ भा.द.वि.सं चे कलम ४१९, ४२० सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम चे कलम ६६(क),(ड) अन्वये ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी अपहरित रक्कम ₹24,85,000/- ही आरोपीच्या 6 वेगवेगळ्या बँक अकाउंट वर पाठविलेली होती. सदर 6 बँक अकाऊंट बाबत खेड पोलीस तपास पथकाद्वारे अधिक माहिती घेण्यात आली व फिर्यादी यांची अपहरित रक्कम ही पुढे अन्य 43 बँक अकाऊंट मध्ये वळवण्यात आल्याबाबत व पुढे 22 वेगवेगळ्या अकाउंट मध्ये वळवण्यात आल्याबाबत माहिती समोर आली व या अपहरित रक्कम पैकी ₹4,50,000/- हे चंडीगढ़ व जोधपूर येथील ATM चा वापर करून काढण्यात आले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, चंडीगढ़ व जोधपूर-राजस्थान या राज्यांमध्ये खेड पोलीस ठाण्याचे एक तपास पथक पाठविण्यात आले. या तपास पथकाने बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या तपासामध्ये एटीएम मधून पैसे काढणाऱ्या इसमाबाबत माहिती घेतली असता एक इसम आपल्या व्यसनाच्या लोभापोटी अन्य व्यक्तीच्या सांगण्यावरून ATM मधून पैसे काढून त्याच्या ताब्यात देत असल्याचे निष्पन्न झाले तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर इसमाचा शोध घेण्यात आला व या गुन्ह्यातिल मुख्य आरोपी नीरज महेंद्र जांगरा, वय -22 वर्षे. सध्या राहणार घर नंबर 178, सेक्टर 38(A), चंडीगढ़ मुळ राहणार कुर्दल -70, भिवाणी-हरियाणा हा चंडीगढ़ येथे मिळून आलेला आहे तसेच त्यास दिनांक २१/०६/२०२४ रोजी अटक करण्यात आलेली असून मा. न्यायालयाने त्यास दिनांक 25/06/2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.हा गुन्हा करताना त्याने अनेकांना शेअर मार्केटच्या नावाखाली जास्त नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवून वेग-वेगळ्या फर्मच्या नावाने अनेक बँक खाते उघडून त्यावर अनेकांकडून रक्कम प्राप्त करुन घेऊन अनेक बँक खात्यांचा व मोबाईल नंबरचा वापर करून फसवणूक केली असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई खालील नमूद पोलीस अधिकारी / अंमलदार यांनी केलेली आहे.1) श्री. नितीन भोयर, पोलीस निरीक्षक, खेड पोलीस ठाणे, रत्नागिरी2) स.पो.नि. श्री. संजय चव्हाण, खेड पोलीस ठाणे,3) पो.हवा/476 दिपक गोरे, खेड पोलीस ठाणे,4) पो.कॉ/९६२ श्री. वैभव ओहोळ, खेड पोलीस ठाणे, 5) पो.शि/1315 रुपेश जोगी, खेड पोलीस ठाणे6) पो.शि /613 सुमित नवघरे, खेड पोलीस ठाणे7) पो.शि /910 शिरीष साळुंखे, खेड पोलीस ठाणे8) पो.हवा /444 रमिज शेख, तांत्रिक विश्लेषण शाखा व 9) पो.शि/739 सौरभ कदम, सायबर पोलीस ठाणे.======≈=====*आवाहन:* याद्वारे आवाहन करण्यात येते की, शेअर ट्रेडिंग Apps चा वापर करून शेअर मार्केट अथवा ट्रेडिंग करण्यापूर्वी ट्रेडिंग Apps ची सत्यता बाबत पडताळणी करावी.कमी कालावधीतील जास्त परतव्याच्या आमिषाला बळी पडू नका.Telegram किंवा WhatsApp द्वारे प्राप्त लिंक वरून ट्रेडिंग App डाउनलोड करू नका. *श्री. धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी.*============

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button