अंगारकी चतुर्थी उत्सवानिमित्त गणपतीपुळेत उद्या पहाटे साडेतीनपासून दर्शन सोहळा
गणपतीपुळे येथील अंगारकी चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीदेव गणपतीपुळे संस्थान, गणपतीपुळे ग्रामपंचायत आणि जयगड पोलीस ठाणे यांच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या अंगारकी चतुर्थी उत्सवानिमित्त स्वयंभू श्रींचे मंदिर पहाटे साडेतीन वाजता दर्शनासाठी खुले होणार आहे.स्थानिक पुजार्यांच्या हस्ते श्रींच्या मंदिरात पूजा अर्चा व मंत्रपुष्प झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येणार आहे. मंदिर परिसरात दर्शन रांगाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांचे पावसापासून संरक्षण व्हावे, म्हणून खास दर्शन रांगांवर ताडपत्री व पत्रे टाकून व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्यावतीने सागरदर्शन पार्किंगमध्ये करण्यात आली आहे. समुद्रकिनारी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, पोलीस कर्मचारी व गणपतीपुळे देवस्थानचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.www.konkantoday.com