हर्णै येथे घराची गॅलरी कोसळून महिला जखमी
२१ जून रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास गॅलरी कोसळून पाजपंढरी येथील एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी दापोली येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पावसाळी हंगाम सुरू होवून सुद्धा पावसाचे प्रमाण खूपच कमी होते. रात्री अचानक जोरदार पाऊस, वादळ वार्याला सुरूवात झाली. जोरदार विजोच्या कडाक्यासह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे दुसर्या दिवशी सकाळी पाजपंढरी शेतवाडी येथील मालती रामचंद्र चोगले या व्हरंडयामध्ये तांदूळ निवडत होत्या. अचानक ८.३० च्या सुमारास त्यांच्या घराला असलेली गॅलरी कोसळली आणि त्या गंभीररित्या जखमी झाल्या. www.konkantoday.com