
खेडचे प्रभारी नगराध्यक्षपदी सुनील दरेकर यांची नियुक्ती
खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे आपल्या पदावर हजर होत नाही तो पर्यंत नगराध्यक्षपदाची सूत्रे उपनगराध्यक्ष सुनील दरेकर यांच्याकडे देण्यात येण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.महामार्गाच्या खराब स्थितीमुळे जगबुडी नदीवरील पुलाचा जोड रस्ता खचला असल्यामुळे आंदोलन करणाऱ्या वैभव खेडेकर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती .त्यांना सध्या 13 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पालिकेचे काम चालण्यासाठी प्रशासकीय दृष्टीने अडचणी येत होत्या तसा अहवाल मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्यावर खेडेकर हजर होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात उपनगराध्यक्षांना नगराध्यक्षपदाचा भार देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
www.konkantoday.com