रत्नागिरी जिल्ह्यातील ५१ खाद्यपदार्थ विक्रत्यांना अन्न व औषध प्रशासनाने दणका दिला

अस्वच्छता आणि परवाना नुतनीकरण करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ५१ खाद्यपदार्थ विक्रत्यांना अन्न व औषध प्रशासनाने दणका दिला.परंतु यांच्यावर थेट कारवाई न करता सुधारणेच्या अटीवर ३ लाख ६६ हजार तडजोरी शुल्क भरून घेऊन पुन्हा संधी देण्यात आली. तर २४ खाद्यपदार्थ विक्रत्यांचे नमुने मानदप्रमाणे नसल्याने त्यांच्यावर १ ते २ लाखापर्यंत दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे. अन्न व औषध प्रशासनानाकडे नोंदणीधारक असलेल्या अनेक विक्रत्यांच्या खाद्यपदार्थांची वारंवार तपासणी केली जाते. खाद्यपदार्थांच्या दर्जामध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही. दर्जाहिन खाद्यपदार्थ किंवा अस्वच्छता आढळल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत कारवाई केली जाते. गेल्या वर्षी अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील ५१ नोंदणीकृत विक्रेत्यांवर कारवाई केली. तपासणीमध्ये दुकानात किंवा भटारखाण्यास आढळुन आलेली अस्वच्छता तसचे परवाण्याचे वेळेवर नुतणीकरण न केल्याने ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडुन तडजोड शुल्क म्हणून ३ लाख ६० हजार वसुल केले आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button