रत्नागिरीतील शैक्षणिक प्रगतीला निरंजन डावखरेंचे पाठबळ!जिल्ह्यातील ८० शाळांमध्ये डिजिटल साहित्य, `जेईई-नीट’साठी मोफत प्रशिक्षण

रत्नागिरी, दि. २३ (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाईच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आमदार निरंजन डावखरे यांनी सातत्याने पाठबळ दिले आहे. जिल्ह्यातील ८० हून अधिक प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये संगणक, प्रोजेक्टरसह विविध डिजिटल साहित्य दिले गेले. तर डॉक्टर, इंजिनिअरसाठी अत्यावश्यक असलेल्या `जेईई-नीट’सारख्या परीक्षांची तयारी करण्यासाठी अॅपवरुन मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचा गौरव असलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कारभारात सुधारणा, प्रकल्पग्रस्तांना नोकरी आदींसाठीही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २६ जून रोजी होत आहे. या निवडणुकीत भाजपासह महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे हॅट्रिकसाठी सज्ज झाले आहेत. त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणातील पाच जिल्ह्यातून मतदारांचा प्रतिसाद लाभत आहे.गेल्या १२ वर्षांच्या काळात कोकणातील तरुणाईचा चेहरा म्हणून आमदार निरंजन डावखरे यांनी ओळख निर्माण केली. कोकणातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे, यासाठी `मिशन एज्युकेशन’ ही मोहीम राबविली. त्यातून केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना डिजिटल साहित्य दिले गेले. तर कोकण कृषी विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांना नोकरीत आरक्षण ठेवावे, यासाठी पाठपुरावा केला. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील युवकांना नोकरी, १९९९ पासूनच्या मत्स्यशास्त्राच्या पदव्या वैध ठरविण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळवून देण्यात आली.सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होणाररत्नागिरी जिल्हा वाचनालयामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र व प्रशिक्षण केंद्राला मान्यता मिळाली आहे. त्याचे कामही लवकरच सुरू होईल. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण मिळेल. त्यामुळे यूपीएससी, एमपीएससीच्या माध्यमातून सरकारी अधिकारी होण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button