पुणे – नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू ,कार आमदाराच्या पुतण्याची

पुणे – नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. भीषण अपघातात कारमधील चालक हा खेडच्या आमदारांचा पुतण्या असल्याची माहिती समोर येत आहे.अपघातानंतर तो गाडीतच बसून राहिला होता.याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे गावाजवळ हा अपघात घडला. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याच्या कारने दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर मयुर मोहिते हा कारमध्येच बसून होता. तर या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या ओम भालेराव या १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.फॉर्च्युनर कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडकली. दोन्ही गाड्यांची धडक इतकी भीषण होती की एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button