
दापोली कुंभवे येथील दुचाकी अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
कुंभवे येथील वृद्ध दुचाकी चालवत असताना तोल जावून पड्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती त्यांचा मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.अनिल रामचंद्र पिंपळकर (६१, रा. कुंभवे) असे या वृद्धाचे नाव आहे. पिंपळकर हे वाकवली रोडने मोटार सायकलने जात असताना तोल जावून खाली पडले. यावेळी त्यांच्या हातापायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ दापोली उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्ययात आले. मात्र तेथून अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथून अधिक उपचारासाठी त्यांना डेरवण व नंतर मुंबई येथे हलविण्यात आले. यावेळी उपचार सुरू असताना पिंपळकर यांचा मृत्यू झाला. याबाबतची खबर डॉ. निशांत ठाकर यांनी पोलिसांना दिली. www.konkantoday.com