जो अन्याय उद्धव ठाकरेंनी केला, तोच रवींद्र चव्हाण करत आहेत, रामदास कदम आता भाजपला भिडले

रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीत असलेल्या भाजप व शिंदे शिवसेनेचे मतभेद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत यामध्ये नेत्यांची वक्तव्य अधिकच भर घालत आहेत एकीकडे भाजपाचे निलेश राणे ,नितेश राणे आरोप करीत असतानाच आता शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम हे भाजपवर आरोप करून त्यांना भिडले आहेतउद्धव ठाकरेंनी योगेश कदमांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला. तोच प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. भाजप मित्रपक्षांना कसं संपवत आहे, त्याचं जिवंत उदाहरण माझ्या मुलाचं आहे. जो अन्याय उद्धव ठाकरेंनी केला, तोच रवींद्र चव्हाण करत आहेत.” असा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी केला आहे”रवींद्र चव्हाण स्थानिक दापोलीतील विधानपरिषदेच्या आमदारांच्या नावानं अर्थसंकल्पात कामे घेतात. स्थानिक आमदारांना बाजूला ठेवून त्यांची भूमिपूजन करण्यासाठी ठाण्यातील आमदार संजय केळकर यांना दापोलीत पाठवण्यातात. स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून, अशी भूमिपूजन करता येत नाही. हा हक्कभंग होतो,” असं रामदास कदमांनी सांगितलं.”दापोलीत भूमिपूजनाचे बॅनर लावण्यात आले. आता हे बॅनर लावले त्याला फोडा आणि भूमिपूजन करण्यासाठी येणाऱ्यांना झोडा, अशी भूमिका मी घेतली. हे जेव्हा त्यांना कळलं, तेव्हा कुणीही भूमिपूजनासाठी आलं नाही,” असं कदमांनी म्हटलं.”ही गोष्ट मी देवेंद्र फडणवीसांच्या कानावर घातली होती. त्यांनी हे थांबवण्याचं आश्वासन दिलं होतं. पण, देवेंद्र फडणवीस यांचं म्हणजे मी मारल्यासारखं कर, तू रडल्यासारखं दाखव, असं आहे,” असंही कदमांनी सांगितलं.”शिवसेनेनं निर्णय घेतला नसता, तर रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री झाले असते का? याची जाणीव त्यांना पाहिजे होती. आमच्यावर अनेक आरोप झाले, तरीही आम्ही ते सहन केले. मंत्रिमंडळ आणि रवींद्र चव्हाण मंत्री झाले. आता तेच आमच्या मुळावर उठले आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया रामदास कदमांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button