एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व कसं तकलादू आहे हे रामदास कदम यांनी दाखवून दिले- भास्कर जाधव यांचा टोमणा
शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना उपहासात्मक टोले लगावत शुभेच्छा दिल्या आहेत. रामदास कदम यांना धन्यवाद दिले पाहिजेत. रामदासभाई सारखा निर्भीड नेता आज महायुतीमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी भाजपचं पाप उघडपणे मांडण्याचं धाडस दाखवलं आहे. असे भास्कर जाधव म्हणाले. एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व कसं तकलादू आहे. हेच आपल्या वक्तव्यातून दाखवून दिले आहे असे जाधव म्हणाले. शिवाय त्यांनी आपल्या निवडून आलेल्या लोकसभेच्या जागा कश्या सोडल्या. भाजपने त्यांचे उमेदवार दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले. मात्र एकनाथ शिंदे यांचे उमेदवार जाहीर करण्यास उशीर लावला. त्यामुळे पराभव झाला. हे सांगण्याचे धाडस रामदास कदम यांनी केले. त्यांनी असेच बोलत रहावे यासाठी त्यांना शुभेच्छा देतो असे भास्कर जाधव उपहासाने म्हणाले. कदम यांनी अजित पवारांबाबतही वक्तव्य केले होते. त्याचाही समाचार जाधव यांनी घेतला. शिवाय या पुढेही भाजप, शिवसेना शिंदे आणि अजित पवारांवर असेच बोलत रहा. त्यासाठी शुभेच्छा देतो असेही जाधव म्हणाले.www.konkantoday.com