सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव तिठ्ठा येथे दुभाजकाला कार धडकली, एक ठार दोन जखमी
मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे प्रकार वाढत असूनकणकवली तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव तिठ्ठा नजीक असलदे पियाळी पूलावरील दुभाजकाला कार धडकून झालेल्या अपघातात सिंधुदुर्ग महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार यशवंत भास्कर तांबे (वय ३५, रा.वैभववाडी) जागीच ठार झाले. ही धडक इतकी जोरात होती की गाडीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. शनिवारी पहाटे ३:१५ वा. च्या सुमारास ही घटना घडली.मुंबई-गोवा महामार्गावरून वैभववाडीच्या दिशेने यशवंत भास्कर व आणखी दोघेजण कारने जात होते. नांदगाव नजीक असणा-या असलदे पियाळी नदीच्या पूलावर आले असता मध्यभागी असणा-या दुभाजकाच्या संरक्षक कठड्याला कार धडकली. अपघात एवढा भीषण होता की, गाडीच्या पूढील भागाचा चक्काचूर होत एअर बॅग खुल्या झाल्या. या अपघातात यशवंत तांबे जाणीच ठार झाले तर इतर दोघांमधील एक जण जखमी असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.