
शासनाच्या नव्या नियमावलीमुळे आता ग्रामीण भागातही ८ मजली घरे महाराष्ट्र नगरविकास नियमावली
रत्नागिरी जिल्ह्याला १ मार्चपासून लागु झाली असून आता ग्रामीण भागातही ८ मजली इमारती उभारणे शक्य होणार आहे. हरितक्षेत्र असेल तरी त्यात शेतघर म्हणजे फार्महाऊस बांधण्याला परवानगी मिळू शकेल. शहर आणि ग्रामीण भाग असा भेद न करता राज्यातील सर्व भागांमध्ये सारखेच विकास नियम लागू करण्यात आले आहेत.नगर रचना विभागातील अधिकृत सूत्रांनी सांगितले की, १ मार्चपासून रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र एकीकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे बांधकाम परवानग्या आणि भूखंड परवानग्या नव्या निकषाप्रमाणे देण्यात येत आहेत.www.konkantoday.com