विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठामध्ये उत्साह वाढला ,रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांच्यात भर

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला पराभव स्वीकाराला लागला असला तरी राज्यातील त्यांची कामगिरी चांगली असल्यामुळे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतही उत्साह संचारला आहे एकीकडे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर भाजप कडुन दावा केला जात असताना आता ठाकरे गटाकडूनही सामंत यांच्याविरोधात लढणाऱ्या इच्छुकांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. ठाकरे गटाकडून भावी उमेदवारांमध्ये माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी ,उदय बने यांच्या नावाची चर्चा होत असतानाच उदय सामंत यांच्या विरोधात आता रत्नागिरी – संगमेश्वर विधानसभा संपर्कप्रमुख सुदर्शन तोडणकर यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने उमेदवारी दिल्यास मी उदय सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढवेन अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे उदय सामंत यांच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या नावांमध्ये आणखीन एका नावाची भर पडली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून कुणाला तिकीट मिळतं याची उत्सुकता आतापासूनच लागून राहिली आहे.यदाकदाचित तिकीट न मिळाल्यास उद्धवसाहेब जो उमेदवार देतील त्याचा प्रचार 200 टक्के केला जाईल, पण मी विधानसभेसाठी इच्छुक आहे असं सुदर्शन तोडणकर यांनी म्हटलं आहे. लोकसभा निकालानंतर आम्ही लगेचच त्यासंदर्भातल्या कामाला सुरुवात केलेली आहे, मी सुशिक्षित उमेदवार आहे त्यामुळे मतदार आपल्याला साथ देतील अशी प्रतिक्रिया यावेळी तोडणकर यांनी दिली आहे. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असो किंवा इतर काही पदाधिकारी त्यांच्याशी देखील माझी प्राथमिक बोलणी झाल्याची माहिती सुदर्शन तोडणकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button