लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांचा रत्नागिरीत मेळावा
लोकसभा निवडणुकीत भाजपा नेते, महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री ना. नारायणराव राणे साहेब यांचा महायुतीच्या माध्यमातून संपन्न झालेला विजय नेत्रदीपक आणि ऐतिहासिक होता. तब्बल ४५ वर्षे कमळ चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला मतदान करण्याची इच्छा असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मतदारांची मनोकामना राणे साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाली.मागील २ पंचवार्षिकात मोदीजींसाठी मतदान झाले खरे पण उमेदवार मोदीजींचा (भाजपाचा) नसल्याची सल मनात असल्याने कार्यकर्त्यांनी तनमनधन अर्पून काम केल्यानेच हा विजय प्राप्त झाला.रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभेतील सर्व देवदुर्लभ कार्यकर्त्यांचे भाजपा कुटुंब म्हणून अभिनंदन करणे आवश्यक होते. शिवाय यापुढील काळात पदवीधर, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा अनेक लढाया विविध स्तरांवर लढणे असल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत करण्यासाठी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर, आम. ऍड. निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, जि. प. रत्नागिरीचे मा. उपाध्यक्ष श्री. सतीश शेवडे आदी सहकारी, पदाधिकारी तसेच देवदुर्लभ कार्यकर्ता बंधूभगिनींच्या उपस्थितीत स्नेहभोजन व मनोगतांचा कार्यक्रम रत्नागिरी येथील जयेश मंगल कार्यालयात पार पडला.www.konkantoday.com