रवींद्र वायकर आणि निवडणूक आयोग यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल
रवींद्र वायकर आणि निवडणूक आयोग यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढविणारे उमेदवार भरत खिमजी शाह यांनी मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी(ता.21)ॲड. असीम सरोदे, ॲड. विनय खातु,ॲड. श्रीया आवले, ॲड. बाळकृष्ण निढाळकर, ॲड. किशोर वरक यांच्या मदतीने याचिका दाखल केली आहे. या याचिकेत 4 जून रोजी झालेली मतमोजणी व निकालाला स्थगिती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत भरत खिमजी शाह यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी,रविंद्र वायकर तसेच महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक यांना प्रतिवादी करण्यास आलेले आहे.www.konkantoday.com