
प्रसिद्ध गणपतीपुळे क्षेत्री २५ जून रोजी अंगारकी यात्रा, प्रशासनाने घेतला आढावा
गणपतीपुळे येथे २५ जून रोजी अंगारकी यात्रा उत्सव होणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली तर रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपतीपुळे येथे श्रींच्या मंदिर सभागृहात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत अंगारकी यात्रोत्सवाचे चोख नियोजन करण्यात आले.या अंगारकी उत्सवाला घाटमाथ्यावरील भाविक मोठ्या संख्येने दाखल होत असतात. यांमध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, इचलकरंजी, कवठेमहाकाळ, मिरज, कराड, इस्लामपूर आदी ठिकाणांहून भाविक स्वयंभू श्रींच्या दर्शनासाठी येतात.यंदा पावसाळ्यात आलेल्या या अंगारकी यात्रोत्सवाच्या दिवशी जर पाऊस पडला नाही तर मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.www.konkantoday.com