
कॉंग्रेस पक्षाने आपला विचार न केल्याने उमेदवारी न दिल्याने नागेश निमकर अपक्ष म्हणून रिंगणात
विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आपण पक्षाकडून उमेदवार म्हणून इच्छूक होतो. मागील काही महिन्यांपासून आपण निवडणूक लढवण्यासंदर्भात तयारीही केली होती. मात्र पक्षाकडून रमेश कीर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. आपला या निवडणुकीसाठी विचार करण्यात न आल्याने आपणासमोर बंडखोरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरली आहे, अशी माहिती अपक्ष उमेदवार नागेश निमकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.निमकर यांनी पाच जिल्ह्यांचा समावेश असलेला हा पदवीधर मतदार संघ भौगोलिक दृष्ट्या मोठा आहे. असे असतानाही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते मात्र येथील तांदळाला बाजारात भाव नसल्याने शेतकरी शेती करणे सोडू लागला आहे. यासाठी कोकणातील तांदूळ बासमतीच्या दर्जाचा झाल्यास त्याचा फायदा येथील शेतकर्यांना होईल यासाठी संशोधन होणे गरजेचे असून त्यासाठी आपण शासनाकडे मागणी करणार आहे, अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार नागेश निमकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.www.konkantoday.com