
साखरपा जाधव वाडी बिबट्याचा संचार महिले पाठोपाठ बिबट्याचा तरुणावर हल्ला
दोन दिवसापूर्वीच साखरपा जाधववाडी येथील लिंगायत नामक महिलेवर वाघाच्या हल्यात जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आता बिबट्याने भर दिवसा तरुणावर हल्ला केल्याने ग्रामस्थांच्या खळबळ उडाली आहेसाखरपा जाधववाडी येथे भर वस्तीत सकाळी काम करणारा अमित जाधव या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. यात हा तरुण गंभीर जखमी झालेला आहे. हाताला व डोक्याला जखमा झाले आहेत अचानक झालेल्या घटनेने परिसरात तणावाचे वातावरणआहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब पिंजरा लावून वाघाला पकडण्याची मागणी होत आहे. यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करून रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी घटना घडताच माजी सभापती जया माने यांनी रुग्णालयात जाऊन जखमी जाधव याची पाहणी केली. त्यांनी वन अधिकारी यांना संपर्क करून चांगलेच धारेवर धरले. सलग दुसरी घटना असल्याने याचा बंदोबस्त ताबडतोब व्हावा अशी मागणी केली.त्यामुळे ताबडतोब साखरपा जाधववाडी या ठिकाणी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पुढील कार्यवाही होणार असल्याचे वनविभागाने सांगितले.