
चिपळूण पालिकेची गती अधिकाऱ्यांविना मंदावली.
नगरपालिका इमारत, ग्रॅव्हिटी पाणीयोजना व अन्य महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना देण्याची गरज असताना अधिकाऱ्यांअभावी नगरपालिकेचा कारभार काहीसा मंदावला आहे. कोळकेवाडी धरणातून शहरात ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा करणारी पाणीयोजना हाती घेण्यात आली आहे. मात्र बांधकाम अभियंताच नसल्याने हेही काम रखडले आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या कामांसह शहरातील अन्य प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. काही नियुक्त्या झाल्या, संबंधितांनी आपापल्या विभागाचा कार्यभार सुरू केला आहे; मात्र अद्यापही पाणीपुरवठासहित बांधकाम विभागातील नगर अभियंता व सहायक अशी पदे भरणे गरजेचे आहे.