वाशिष्ठीतील गाळ उपशानंतर पुण्यातील संस्थेकडून वाशिष्ठी जलवहन क्षमतेचा अभ्यास
जुलै २०२१ मध्ये चिपळूण शहर व परिसरात आलेल्या प्रलयंकारी महापुरानंतर वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू झाले. तीन वर्षाच्या कालावधीत सुमारे १८ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. दरम्यान गाळ काढल्यानंतर वाशिष्ठी नदीची वाढलेली वहन क्षमता, खोली आदी बाबींचा सर्व अभ्यास करण्याचे काम पुण्यातील संस्थेकडून सुरू करण्यात आले. पुढील आणखी काही दिवस हे काम सुरूच राहणार असून शहराची लाल व निळी पूररेषा निश्चित करण्यासाठी हा अभ्यास दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे. www.konkantoday.com