
भजन सम्राट भगवान बुवा लोकरे व कोकणरत्न द्वारकानाथ बुवा नाटेकर यांची खारवी समाज पतसंस्था संचालकांसमवेत ह्रदयस्पर्शी भेट
रत्नागिरी: श्री देव महापुरुष देवस्थान पूर्णगडच्या वतीने श्रावण महिन्यातील पहिल्या शनिवारी सत्यनारायण पुजेच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यानिमित्ताने रक्तदान शिबिराबरोबर भजनाची डबलबारी आयोजित करण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील अग्रक्रमाने नाव घेतल्या जाणाऱ्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरीच्या अतुलनीय असे काम करणाऱ्या संचालकांचा यानिमित्ताने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी, उपाध्यक्ष सुधीर वासावे, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष कमलाकर हेदवकरसर, संचालक मदन डोर्लेकर, संचालक कृष्णा तांडेल व तज्ञ संचालक अरविंद डोर्लेकर यांचा यांचा श्रीदेव महापुरुष देवस्थान पुर्णगड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक मंडळ व जेष्ठ रंगकर्मी राम सारंग, भजन सम्राट भगवान बुवा लोकरे भजन क्षेत्रातील नामांकित कोकणरत्न बुवा द्वारकानाथ नाटेकर अशी समाजातील नामांकित मंडळी एकत्र येऊन समाजातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी यानिमित्ताने एकत्र येण्याचा योग आला.
www.konkantoday.com