रत्नागिरी शहरातील नवीन भाजी मार्केट मधील गाळेधारकांची पालिकेच्या नोटीस विरोधात न्यायालयात धाव
रत्नागिरी शहरातील नवीन भाजी मार्केटच्या धोकादायक इमारतीतील आतील, बाहेरील सर्व गाळेधारकांना नोटीस बजावून गाळे रिकामे करण्याची नोटीस बजावली. या नोटीस विरुद्ध गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेवून नोटीसला स्थगिती देण्याची विनंती केली आहे. नवीन भाजी मार्केटची इमारत रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीची आहे. स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आल्यानंतर सर्व गाळेधारकांना आपापले गाळे खाली करून रनपच्या ताब्यात देण्याची नोटीस दिली. गाळे धारकांच्या कराराची मुदत संपलेली नसल्याने त्या नोटीसविरूद्ध काही वर्षापूर्वी न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयात प्रलंबित प्रकरणी न्यायालयात अंतिम युक्तीवाद होणे शिल्लक आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा न.प.ने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनांतर्गत खबरदारी म्हणून गाळेधारकांना पुन्हा नोटीस बजावली आहे.www.konkantoday.com