महाराष्ट्रात समुद्री मच्छिमारीत २४ टक्क्यांची वाढ, सीएमएफआरआयची आकडेवारी
सलग दुसर्या वर्षी महाराष्ट्रामध्ये समुद्री मच्छिमारांत वाढ झाल्याची आकडेवारी सीएमएफआरआयने जारी केली आहे. २०२२ मध्ये १७ लाख टन उत्पादन नोंदवण्यात आले. ते २.११ लाख टनावर जावून पोहोचले. एकूण २४.३ टक्के एवढे उत्पादन वाढले.केंद्र सरकारच्या संस्थेने नियमितपणे मच्छिमारीचे सर्वेक्षण करून आकडेवारी जारी केली आहे. या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे की, मुंबई शहर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक समुद्री मच्छिमारी झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. राज्यात पकडलेल्या मच्छिपैकी ३३.९१ टक्के एवढा तेथील सहभाग आहे. रायगड जिल्ह्यात २१.१६ टक्के एवढे मासे सापडले. रत्नागिरी जिल्ह्यात २०.९८ टक्के एवढे मासे सापडले. गोवा, दमण आणि दीवमध्ये अनुक्रमे १६.८ आणि २३.२ टक्के एवढी मासेमारीत वाढ झाली.www.konkantoday.com