दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली न्यायालयाने कथित लिकर घोटाळ्याप्रकरणी अखेर जामीन मंजूर केला आहे. केजरीवाल यांच्या विरोधात ईडीकडे कोणतेही पुरावे नाहीत, असा युक्तीवाद त्यांच्या वकीलाने केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.त्यानुसार केजरीवाल उद्या शुक्रवारी तुरुंगाबाहेर येतील.केजरीवाल यांना ED ने 21 मार्च रोजी 2021-22 च्या दिल्ली मद्य धोरण तयार करताना मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली. केजरीवाल यांनी दिल्लीतून मद्यविक्रेत्यांकडून मिळालेला पैसा गोव्यातील पक्षाच्या प्रचारासाठी वापरल्याचाही आरोप ईडीने केला होता. मात्र याबाबत ईडीकडे कोणतेही पुरावे नसल्याचा युक्तीवाद केजरीवाल यांच्या वकिलाने केला आहे.