दापोली तालुक्यातील उंबर्ले येथे घरफोडी, संशयित अटकेत

दापोली तालुक्यातील उंबर्ले येथे असलेल्या साई द्वारका गृह संकुलमध्ये घरफोडी करून सुमारे ५१,००० रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना ६ जून रोजी संध्या. ६ ते १३ जून सकाळी ८ वाजण्याच्या मुदतीत घडली.दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप चंद्रकांत कळंबटे (३४, रा. दाभोळ, श्रीरामनगर) हे साई द्वारका गृह संकुल उंबर्ले येथे व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत.त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ६ जून रोजी संध्याकाळी ६ ते १३ जून सकाळी द्वारका गृह संकुलामधील बिल्डींग नंबर ६ रो हाऊस नं. ३ व बिल्डींग नंबर २ रूम नं. ४ मध्ये घरफोडी होवून ५ हजार रुपये किंमतीचा १ पांढर्‍या रंगाचा इन्वर्टर, ५,००० रुपये किंमतीचा १ राखाडी रंगाचा ओव्हन व १ हजार रुपये किंमतीचे काळ्या रंगाचे दोन डंबेल्स असे एकूण अकरा हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरी झाले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button