चिपळुणातील शिरगांव उपनदीतील अतिक्रमणामुळे नदीचा प्रवाह बदलतोय
चिपळूण तालुक्यातील शिरगांव येथे चिपळूण-कराड महामार्गालगत वाशिष्ठी नदीला येवून मिळणार्या उपनदी पात्रात शिरगांव वरची बौद्धवाडी दरम्यान मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. यामुळे नदीचा प्रवाह दिवसेंदिवस विरूद्ध बाजूस झुकत आहे. नदी पात्रात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाल्यास पाण्याचा प्रवाह बौद्धवाडीकडे वळतो. त्यामुळे याबाबत योग्य नियोजन व्हावे व ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विपुल खोत यांच्याकडे ग्रामस्थ सुरज शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.www.konkantoday.com