
चिपळुणातील केक ऑफ द डे बेकरीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई, मालाची विल्हेवाट
सोशल मिडिया आणि प्रसार माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी गुरूवारी चिपळूण शहरातील काविळतळी येथील प्रसिद्ध केक ऑफ द डे बेकरीवर धाड टाकत कारवाई केली. अधिकार्यांनी यावेळी आढळून आलेली मुदतबाह्य १५ किलो टुटी फ्रुटी, १२ मुदतबाह्य पावांच्या लाद्या, अस्वच्छ केकचा बेस जागेवर नष्ट केला. अन्न व सुरक्षा अधिकारी सुहास पाटील, विजय पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्याात आली.www.konkantoday.com