
असुर्डे ग्रामपंचायतीजवळ नियंत्रण सुटल्याने टँकर दोन दुकानात घुसला, अनर्थ टळला
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने रत्नागिरीकडे चाललेल्या टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट महामार्ग सोडून जवळच्या दोन दुकानात मागील बाजूने घुसला. ही घटना गुरूवारी आसुर्डे ग्रामपंचायत उताराजवळ घडली. पाऊस असल्याने रस्त्याजवळ फारशी वर्दळ नव्हती. अन्यथा मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.सावर्डेहून येताना असुर्डे ग्रामपंचायतीजवळच्या उतारात गुरूवारी दुपारी १२.३० च्या सुमारास टँकरचा विचित्र अपघात घडला. अपघातग्रस्त टँकरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर टँकर रस्ता सोडून थेट तेथील नांदगाव रस्त्यावरील दोन दुकानात मागील बाजूने घुसला. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. www.konkantoday.com