
अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात योग दिन साजरा
21जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील अनेक देशांमध्ये योगासन व प्राणायाम करून देशांचे नागरिक योग दिन साजरा करतात.योग दिनानिमित्ताने रत्नागिरीतील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी योगासन प्रात्यक्षिक करून हा दिन साजरा केला.या उपक्रमामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील 30 एनएसएस स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. त्यांच्यासोबत एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा.निनाद तेंडुलकर, प्रा.अभिजीत भिडे, प्रा.स्नेहा बाणे व प्रा.स्मिता पाथरे यांनी सहभाग घेतला. तसेच क्रीडा शिक्षक प्रा. लीना घाडीगांवकर, प्रा. राकेश मालप, कर्मचारी श्री. महेश खैरे, श्री. आदेश पुसाळकर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा.विद्याधर केळकर उपस्थित होते.