शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते प्रशांत पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, व शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते प्रशांत पाटील यांचे गुरुवारी २० जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५६ व्या वर्षी नवी मुंबईतील आपोलो रुग्णालयात दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.विशेष म्हणजे कोकण पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ १८ जूनला पनवेल येथे पदवीधर मतदार आणि कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित राहून उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शनही केले होते.१९ जूनला रात्री त्यांना थोडे अस्वस्थ वाटू लागल्यामुळे, रात्री उशिरा त्यांना नवी मुंबईतील आपोलो रुग्णालयात दाखल केले.त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली व हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button