आचारसंहितेनंतर दिव्यांगाना उपलब्ध योजनांचा लाभ देणार, प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करणार
आर्थिक वर्षामध्ये दिव्यांग पात्र लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे सादर करावयाचे आहेत. केवळ आचारसंहिता असल्याकारणाने दिव्यांगाचे प्रस्ताव मंजूर करण्यात येत नाहीत. आचारसंहिता संपल्यानंतर दिव्यांगाना उपलब्ध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे दिव्यांगाना लाभ मिळणार नाही, अशी बाब नाही. त्याचप्रमाणे दिव्यांगांच्या माहितीसाठी जिल्हा परिषदेने घेतलेल्या या नाविन्यपूर्ण योजना दिव्यांगांच्या जीवनमान उंचावणार्या असल्याने या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार यांनी केले आहे.अन्यायाविरोधात २४ रोजी जिल्हा समजकल्याण कार्यालयावर धडक देणार असल्याचा इशारा दिव्यांग समन्वय सीमतीने दिला आहे.www.konkantoday.com