
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पिंगुळी येथे चीपी विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आत्महत्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील आनंदवन या कॉम्प्लेक्समध्ये राहणारे अविनाश जाधव यांनी बुधवारी १९ जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राहत्या कॉम्प्लेक्स चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली.यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली. अविनाश जाधव यांचे वय ४८ होते आणि ते मुळचे अकोल्यामध्ये राहणारे होते.अविनाश जाधव हे अकोला येथील असून ते चिपी एअरपोर्ट येथे कामाला होते. ते त्यांच्या पत्नी मुलगा आणि मुलगी यांच्यासह पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील आनंदवन कॉम्प्लेक्स येथे भाड्याने राहत होते. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी चौथ्या मजल्यावरून खाली उडी घेतली. यामध्ये त्यांच्या डोक्याला तसेच शरीरावर इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचाराच्यादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.www.konkantoday.com